बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राजकारणात आरोप- प्रत्यारोप होत असतात. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आज मात्र चिखली विधानसभाच्या आमदार श्वेता ताई महाले यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन खळबळ जनक आरोप केला.चिखली विधानसभा मतदारसंघात 350 पांदण रस्ते कामात 56 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली.विशेष म्हणजे पांदण रस्त्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप पत्रकारांपुढे ऐकायला ठेवली.
दरम्यान काही काळ काँग्रेस भवनसमोर भाजपा कार्यकर्त्यांनीआमदार श्वेता महाले यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
बुलढाण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.या पत्र परिषदेत राहुल बोंद्रे म्हणाले की,मी चिखली विधानसभा आमदार असताना लोकसहभागातून पांदण रस्ते खुली करण्याची मोहीम राबवली.शासनाचा एकही पैसा लागू दिला नाही.दरम्यान शासनाने मातोश्री पांदन रस्ता योजना आणली आणि चिखली विधानसभा मतदारसंघात 350 रस्ते मंजूर केले.विशेष म्हणजे याच लोक सहभागातील झालेल्या रस्त्यावर गीट्टीचा थर टाकण्यात आला.त्यासाठी प्रत्येक ठेकेदाराला 8 लाख रुपये देण्यात आले.एका पांदण रस्त्यातून 16 लाखाचातर 350 रस्ते कामात 56 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचे ते म्हणाले.पुढे बोंद्रे म्हणाले की,या कामाची इस्टिमेट बी ॲण्ड सी ने तयार केले.राहुल बोंद्रे यांनी पत्रकारांना ऑडिओ क्लिपरेकॉर्डिंग ऐकवली.परंतु हॅलो बुलढाणा याची पुष्टी करत नाही.