spot_img
spot_img

भीम आर्मीच्या संवाद बैठकीत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश ‘वन कॉल प्रॉब्लेम सॉल’ – जिल्हाध्यक्ष सतीश पवार

खामगाव (हॅलो बुलढाणा)भीम आर्मी भारत एकता मिशन संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद खासदार (नगिना)

यांचा संपूर्ण देशात सुरू असलेला झंझावात बघता बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुका येथे भीम आर्मी ची संवाद व नियुक्ती बैठक जिल्हा अध्यक्ष भाई सतीश दादा पवार व जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र खंडेराव यांच्या उपस्थितीत पार पडली.या संवाद बैठकीत शेकडो पदाधिकाऱ्यांनी भीम आर्मी प्रवेश घेतला आहे.

सतिश दादा पवार यांनी मार्गदर्शन करतांना
बैठकीत खामगाव सह जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न, समस्या, सोडविण्याची मोहीम आज पासून भीम आर्मी हाती घेणार आहे. ‘वन कॉल प्रॉब्लेम सॉल’
ही योजना भीम आर्मी जिल्ह्यात राबवणार आहे.
येणाऱ्या विधान सभे मध्ये भीम आर्मी जिल्ह्यात उमेदवार उभे करणार असून भीम आर्मी ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे सतिश दादा पवार यांनी बैठकीत जाहीर केले आहे.

जिल्ह्यात होणारे अन्याय, अत्याचार यांच्या विरोधात भीम आर्मी ताकदीने आवाज उठवणार असून तळागाळातील लोकांपर्यंत न्याय देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे तसेच शिक्षण, आरोग्य, सुविधा यांच्यावर सुद्धा भीम आर्मी सतत विशेष लक्ष ठेवणार आहे . बैठकीमध्ये विविध संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांचा भीम आर्मी मध्ये प्रवेश देखील कऱण्यात आला.
यावेळी बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन खरात, बाला राऊत जिल्हा संघटक अँड. कैलाश कदम विधी सल्लागार, जिल्हा सहसचिव शांताराम दामोदर, परेश ठाकरे, आकाश खंडेराव, संतोष हिवराळे, अमजद खान हबीब खान, अशरफ शेख रफिक शेख, राजेश मोरे, मोहम्मद अलियार, राहुल बावस्कर, रवी गवई, अभिलाष गवई, भूषण वकोडे, मंगेश गवई, विनय वानखेडे, गोवर्धन तेनंकर, यशवंत गवई, प्रकाश धुरंधर, अमोल मोरखेडे, राजू धन द्रवे, उमेश वानखेडे, रामकृष्ण दाभाडे, काशिनाथ राखोंडे, बालुभाऊ उगले, शेख सोहिन, शेख रिजवान
व स्थानिक नागरिक बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!