मोताळा (हॅलो बुलढाणा) याबाबत सविस्तर वृत्त असे की तहसीलदार वैभव पिलारे यांच्या हुकुमशाही कार्यपद्धतीच्या विरोधात मोताळा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्रित येत दि.१ फेब्रुवारी २०२४ रोजी तहसीलच्या आवारात बैठा सत्याग्रह केला होता परंतु तहसीलदार पिलारे यांच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल झालेला नव्हता त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष मेढे यांनी ४ मार्च ते ८ मार्च असा चार दिवसीय आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता मात्र तेव्हा लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर तहसीलदार बदलीचे आदेश रद्द करण्यात आले होते आता उपोषणाच्या चार महिन्यानंतर तहसीलदार पिलारे यांची बदली झालेली असून सामाजिक कार्यकर्ते संतोष मेढे आणी त्यांच्या सोबत असलेले सर्वपक्षीय नेते मंडळींच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले आहे.