6.3 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

रविकांत तुपकरांची मलकापूर उपविभागीय कार्यालयावर धडक ! शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी आक्रमक!

मलकापूर (हॅलो बुलढाणा) पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली आज ०३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पिकविमा, नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास व शेतकऱ्यांच्या फसवणूक करणाऱ्या व्यापारी डॉ.प्रफुल्ल पाटील यांच्या कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.

मलकापूर परिसरात डॉ.प्रफुल्ल पाटील नामक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. हा व्यापारी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सोयाबीन-कापूस पैसे न देता खरेदी करून फरार झाला आहे. या व्यापाऱ्याने जवळपास ९० कोटी पेक्षा रकमेचा शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. या व्यापाऱ्यांची संपत्ती विकून शेतकऱ्यांची संपूर्ण वसूल करून द्यावी अशी आक्रमक भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली. तसेच शेतकऱ्यांना गेल्यावर्षीचा १००% पिकविमा मिळावा तसेच नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे, वन्यप्राण्यांनी शेतापिकांच्या केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, गेल्यावर्षीचा सोयाबीन-कापसाला प्रति क्वि.३०००/- रु. भाव फरक तातडीने मिळावा, तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार राहुल तायडे व मलकापूर शहरचे ठाणेदार श्री.गिरी यांच्या चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत आज शांततेच्या मार्गाने आलो आहे, लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिला.
या मोर्चाला दामोदर शर्मा, अमोल राऊत, गजानन भोपळे, सचिन शिंगोटे, निलेश नारखेडे, रणजित डोसे, दत्ता पाटील, भागवत धोरण, विजय बोराडे, उमेश राजपूत, समाधान भातुरकर, राहुल मोरखेडे, विवेक पाटील,ललित डव्हले, अतुल पाटील, प्रवीण पाटील, अतुल नारखेडे, यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!