भादोला (हॅलो बुलढाणा) लहान मुलांचे भांडण सुरू होते.त्यात भांडण सोडविण्यासाठी गेलेला 19 वर्षे युवक शेख शाहिद शेख कौसर यांनी मुलाला का मारले हे विचारले असता त्याला एका अल्पवयीन आरोपीने चाकू मारून गंभीर जखमी केले आहे.
याबाबत फिर्यादी शाहिद शेख कौसर यांनी पोलिसांना तक्रार दिली आहे की, दोन ऑगस्ट रोजी साडेचार वाजता च्या सुमारास भादोला येथे लहान मुलांची भांडणे सुरू होती.दरम्यान शाहिद शेख कौसरहे भांडणे सोडवण्यासाठी मधात गेले असता आणि त्यांनी अल्पवयीन आरोपीला मुलाला का मारले असे विचारले असता,अल्पवयीन आरोपीने क्षुल्लक कारणावरून चाकू हल्ला करून शाहिद शेख कौसर यांना जखमी केले.याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आल्यावर आरोपी विरोधात कलम 115(2)कलम 118(2)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














