बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एसटी बस व बोरवेल ट्रकचा समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला ही घटना आज 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हातनी गावाजवळ घडली आहे.
सोलापूरवरून चिखली मार्गे बुलढाणा कडे बस येत होती. तर बुलढाणा मार्गावरून चिखलीकडे बोरवेल ची मशीन घेऊन जाणारा ट्रक जात होता. चिखली मार्गावर असलेल्या हातनी गावाजवळ समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण 12 प्रवासी हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही मात्र प्रवासी हे जखमी झाले आहे.
सदर अपघातात झालेले जखमी प्रवासी भाऊराव जेऊघाले वय 54 वर्षीय रा. वरवंड, कांताबाई देवदास बोरकुल 60 वर्षीय रा. डोंगरखंडाळा, शोभा तुकाराम तळेकर 40 वर्षीय रा डोंगर खंडाळा, कमल परसराम भराड 70 वर्षीय रा दत्तपूर , पूर्णा बाई गोविंदराव इंगळे 70 वर्षीय रा डोंगर खंडाळा, शोभा काळे 55 रा बुलढाणा, रेखा कानडजे 46 रा बुलढाणा, लालसिंग बलवंत 62 रा माजलगाव, उत्तम बुरुकुल 60 रा डोंगर खंडाळा, भगवान गवई वय 45 वर्षे रा बुलढाणा, शेषराव जाधव वय
60 वर्षीय रा देऊळघाट, शोभा इंगळे वय 49 रा डोंगर खंडाळा असे 12 प्रवासी हे जखमी झाले . त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.














