6.3 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

‘हा रस्ता आमच्या बापाचा!’ आ.संजय रायमुलकरांच्या वाढदिवसानिमित्त ६ दिवसांपासुन रस्त्यात भव्य मंडप ! -भिम आर्मीचे जिल्हा महासचीव डाॅ. राहुल दाभाडे यांची कारवाईची मागणी

मेहकर (हॅलो बुलढाणा) आमदार झाले की,कुठेही काही करा..असा समज आमदार संजय रायमुलकर यांचा झालेला दिसतो.रस्त्यातच गेल्या ६ दिवसापासून टाकलेला मंडप रहदारीला अडथळा ठरत आहे.दरम्यान

भिम आर्मीचे जिल्हा महासचीव डाॅ. राहुल दाभाडे यांनी कारवाईची मागणी केली आहे.मेहकर शहरातील रहदारीचा मुख्य रस्ता असलेल्या डिपी रोडवर गेल्या ५-६ दिवसांपासुन भव्य-दिव्य स्टेज व प्रशस्त असा मंडप टाकण्यात आला आहे.हा मंडप व स्टेज उभारत असताना त्याठिकाणचे विद्युत खांब हटविण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.तसेच या मार्गावरुन विविध शाळांचे विद्यार्थी जात असतात.विद्यार्थी,महिला,नागरिक तथा सर्वांनाच या मंडपामुळे ञास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे अधिक माहिती घेतली असता समजले कि,सबंधित ठिकाणी आमदार संजय रायमुलकार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे दिसते.
काल सायंकाळी दि.१ आगस्ट २०२४ रोजी देखील एका कार्यक्रमाचे आयोजन त्या ठिकाणी असल्याने मेहकर-नागपुर या राज्यमहामार्गावर सायंकाळी ६-१० या वेळेत वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
आमदार संजय रायमुलकर या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असुन त्यांच्याकडुन असे बेजबाबदारपणाचे वर्तन अशोभनीय आहे.
लोकप्रतिनिधीचे हे वर्तन कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणारे आहे.
सांस्कृतिक, सामाजिक वा राजकीय स्वरुपाचे कार्यक्रमांसाठी मेहकर शहरात नगरपालिकेचे स्वातंञ्य मैदान येथे प्रशस्त असा स्टेज व जागा असल्याने सर्व कार्यक्रम स्वातंञ्य मैदानावरच होत असतात.
विशेष म्हणजे आमदार निधीमधुनच त्याठिकाणी सुशोभिकरण करण्यात आल्याची माहिती आहे.असे असताना देखील आमदार महोदयांनी अशाप्रकारे या कार्यक्रम घेणे अनाकलनीय आहे.
आमदार महोदयांचा कार्यक्रम असलेल्या ठिकाणी उद्या सर्वांनीच कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली तर? या नियमबाह्य प्रकाराविरोधात भिम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष सतिश दादा पवार यांच्या मार्गदर्शनान्वये जिल्हा महासचिव तथा विधानसभा प्रभारी राहुल दाभाडे यांनी उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे कि,रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदर कार्यक्रमाचे आयोजक व आयोजनास प्रोत्साहन देणारे आमदार संजय रायमुलकर तसेच सदर कार्यक्रमास परवानगी दिली असल्यास संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

अन्यथा भिमआर्मी संस्थापक खासदार एडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद (रावण) यांचा नियोजीत सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या मेहकर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक प्रचार दौर्‍यावेळी आज कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणीच जाहिर सभेचे आयोजन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी राहुल दाभाडे यांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!