बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कागदपत्रात काही त्रुटी आढळल्या किंवा शैक्षणिक कामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 200 ते 300 किलोमीटरचा प्रवास करीत अमरावती बोर्डात जावे लागते.परंतु हा खर्च विद्यार्थ्यांना झेपवत नाही.त्यामुळे अमरावती बोर्डाचा सहविभाग बुलढाणा जिल्ह्यात देण्यात यावा,अशी मागणी एन एस यु आय च्या माध्यमातून करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बुलढाणा ,चिखली मेहकर ,धाड, मलकापूर, खामगाव, देऊळगाव राजा सिंदखेडराजा, आदी शहरातील आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक कामासाठी किमान 100 किलोमीटरच्या आत येणे जाने करावे लागेल त्यामुळे अमरावती बोर्डाचा उपविभाग बुलढाण्यात देण्यात यावा,अशी मागणी एन एस यु आय ने एका निवेदनाद्वारे केली आहे.मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.