बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत मराठीत भरलेले फॉर्म डिलीट होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. परंतु असे काही नाही.ज्यांनी आतापर्यंत मराठीतून अर्ज भरले त्यांना निश्चितच लाभ मिळणार आहे. परंतु यापुढे इंग्लिश मध्ये अर्ज करावा, चुका करू नये असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद एंडोले यांनी ‘हॅलो बुलढाणा’ च्या माध्यमातून केले आहे.
श्री प्रमोद एंडोले म्हणाले की,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या जवळपास 5 लाख एवढी आहे. आतापर्यंत 3 लाख 70 हजार अर्ज ऑनलाईन भरून झाले आहेत.अर्ज अपलोड करणे सुरू आहे. प्रशासकीय स्तरावर 6 ते 7 तारखेपर्यंत हे अर्ज अपलोड करायचे आहेत.विशेष म्हणजे आतापर्यंत मराठी मध्ये ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांना लाभ मिळणार नाही असा गोंधळ उडाला आहे.परंतु त्यांनी घाबरून जाऊ नये, आतापर्यंत मराठीत अर्ज भरलेल्या निश्चितच लाभ मिळणार आहे.यापुढे मात्र इंग्रजी मध्ये अर्ज , चुका करू नये.. कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावीत… रक्षाबंधनाला पहिला हप्ता लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे शासन स्तरावर सांगण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रमोद येंडोले यांनी दिली आहे.