सिंदखेडराजा(हॅलो बुलढाणा/राजेंद्र घोराडे)सिंदखेडराजा येथील मासाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळा समोरील बगीच्या मध्ये असलेल्या झाडांचे काल पुरातत्व खात्यातील अधिकाऱ्यांकडून निर्दलन करण्यात आले.छान तयार करण्यात आलेला बगीच्या व त्यामध्ये जपण्यात आलेली झाडे यांची कत्तल पाहून मन गहिवरून आले, एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा असा उद्देश सर्व जगाला करते आणि त्यांचाच पूरातत्व विभाग,कित्येक वर्षापासून जपलेल्या झाडांना कुऱ्हाडी लावत आहे. एका बाजूने हा मूर्खपणा चालला असताना,मोती तलावाच्या भिंतीवर कित्येक वर्षापासून जी झाडे झुडपे आहेत त्यामुळे तलावाच्या भिंती कोसळण्याच्या मार्गावर आहेत,ये भिंतीवरील झाडे कापण्यासाठी पुरातत्व विभाग पूर्णपणे निष्क्रिय असल्यासारखे वाटते.अशा प्रकारे माँ जिजाऊ साहेब यांच्या जन्मस्थळासमोरील बगीच्यातील झाडें पुरातत्व विभागाकडून कापण्यात आल्यानंतर कु. गायत्री शिंगणे यांनी प्रतिक्रिया दिली.
एका ऐतिहासिक वास्तुला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या झाडांना कापले जात आहे, तर ऐतिहासिक वास्तूंचा वारसा नष्ट करू शकत असलेल्या झुडूपांना संरक्षण प्रदान केले जात आहे, हा प्रकार म्हणजे “गाईंना मारून घुशी पाळण्याचा” प्रकार म्हणता येईल.त्यामुळे सदर प्रकाराचा आपण जाहीर निषेध करत असून या प्रकरणात कारणीभूत असलेल्या पुरातत्व खात्यांचे अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आपण मागणी करणार असल्याचे गायत्री शिंगणे पुढे म्हणाल्या.