spot_img
spot_img

नागपुजा होणारच..पण सर्पमित्रांचा सन्मान कधी?

मेहकर (हॅलो बुलढाणा) आगामी ऑगस्ट महिन्यात 9 तारखेला नागपंचमी सणानिमित्त मोठ्या श्रद्धेने नाग पूजा होणार आहे.परंतु जीव धोक्यात टाकून घरात – शेतात आढळून आलेले अति विषारी साप पकडून नागरिकांना भयमुक्त करणाऱ्या सर्पमित्रांचा शासन कधी सन्मान करणार?हा प्रश्न निर्माण झाला आहे.

अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणी मित्र संघटना यांच्या नेतृत्वाखाली वन्यप्राणी संवरक्षण आणि बहुउद्देशीय स्वंस्था निसर्ग मल्टी प्रपजं फाऊंडेशन लोणार मेहकरच्या व सर्पमित्राच्या मागणी संदर्भात तहसीलदार यांना 30 जुलै रोजी निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,
सर्पमित्रांना प्राणी मित्रांना अपघाती वीमा, सर्पदंश वीमा मिळावा,
सर्व सर्पमित्रांना व प्राणी मित्रांना शासकीय ओळखपत्र देण्यात यावे,सर्प मित्र प्राणी मित्र यांच्या सेवेला अत्यावश्यक सेवेत ( फ्रंट लाईन वर्कर्स ) सदरा मध्ये समाविष्ट करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. साप व प्रत्येक वन्यजीव जरी मोलाचा असला तरी सर्पमित्र हा लाख मोलाचा आहे. त्यामुळे शासनाने सर्पमित्र व प्राणी मित्रांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी देखील
सर्पमित्र बंटी विजय नरवाडे , सर्पमित्र शंकर भोसले, सर्पमित्र ऋतीक सूसर, सर्पमित्र चंदू अंभोरे आदींनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!