बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एकेकाळी युवा काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस , काँग्रेस सोशल मीडिया सारख्या महत्त्वाच्या पदावर उत्कृष्ट काम करून जबाबदारी पार पडलेल्या प्रा.निलेश गावंडे यांनी नंतर महाराष्ट्र शिक्षक आघाडीची स्थापना करून महाराष्ट्र विधान परिषदेची शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढविली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हते परंतु आता मात्र त्यांनी मुकुल वासनीक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश घेतला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय अंभोरे, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे व इतर पक्षातील हितचिंतक प्रवेश वेळी उपस्थित होते. प्रा. निलेश गावंडे यांनी महाराष्ट्रातील युवक युवतींची , महिलांची , शेतकरी शेतमजुरांचे , सरकारी शाळांची महाविद्यालयांची शासनाच्या दुर्लक्षामुळे होणारी दुरावस्था विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयांचे प्रश्न केंद्र सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्राची होऊ पाहणारी हानी आणि यामुळे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून चिंता वाटत असल्याने लोकशाहीच्या मजबुतीसाठी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याचा प्रण घेतला आहे. दरम्यान प्रा. निलेश गावंडे यांनी काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी जाहीर प्रवेश घेतला आहे.