बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अशांत व अस्थिर परिस्थितीत प्रशासकीय वा पोलिसी प्रयत्नांना जनतेचा सहभाग आणि प्रयत्नांची स्वयंसेवी स्वरूपात साथ मिळावी, या उद्देशाने होमगार्ड कार्यरत असतात. त्यामुळे होमगार्डच्या नोकऱ्या शोधत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील स्त्री व पुरुष रिक्त होमगार्ड अनुशेष पूर्ण करण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात येत आहे.
बुलढाणा जिल्हा होमगार्ड दलात 133 पुरुष व 115 महिला
असे 248 मानसेवी होमगार्ड चा अनुशेषअसून सदरचा अनुशेष भरून काढण्याकरिताहोमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. होमगार्ड नोंदणी 26 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे.त्यासाठी 30 जुलै ते 19 ऑगस्ट अखेर सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. याबाबतची अधिक माहिती नियम दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावा,येथील पोलीस कवायत मैदानावर ही नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे,असे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी कळविले आहे.