बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पुरातत्त्व विभागाला सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळा समोर कोणता विकास साधायचा आहे हे माहीत नाही.परंतु येथील मोठमोठ्या झाडांची आज कत्तल करण्यात आल्याने नागरिकांमध्ये असंतोष दिसून आला.असे समजते की,राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोरील उंच झाडे तोडण्याची मागणी काही समाजसेवींनी केली होती.त्यांचे म्हणणे होते की महामार्गावरून राजवाडा दिसत नाही.त्यामुळे ही झाडे तोडली असावी असा कयास आहे.
सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळा समोर अस्तित्वात असलेली अनेक वर्षापासून झाडे उभी होती.या झाडांमुळे राजवाड्याची सौंदर्य खुलले होते. पुरातत्व विभागाने मात्र या झाडांची कत्तल केल्याचे चित्र आज दिसून आले.
ऐतिहासिक राजवाड्या समोरीलउंच उंच झाडांमुळे लांबून राजवाड्याचा पार्श्वभाग दिसत नसल्याची ओरड होती.सदर उंच झाडे आठ दिवसात न तोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा राजू मेहत्रे घनश्याम केळकर,सुनील आढाव,रामेश्वर मेहत्रे,उमेश खरात यांनी दिला होता.दरम्यान
पुरातत्त्व विभागाने या झाडांच्या मुळावर घाव घातला.एकीकडे झाडे लावण्यासाठी लाखोंचा खर्च केला जातो. दुसरीकडे पुरातत्त्व विभागाने झाडे तोडल्यामुळे सिंदखेडराजा येथील नागरिकांनी व निसर्गप्रेमींनी याचा निषेध व्यक्त केला आहे.