spot_img
spot_img

ते नियुक्त कर्मचारी कोठे आहेत ? याचा शोध केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी घ्यावा! बळीराजांना पिक विमा मिळेना! रब्बी पीक नुकसानी वाटपातही गोंधळ!

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/दर्शन गवई) सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पिक विम्याची प्रतीक्षा आहे.रब्बी पिक नुकसानीचे वाटपातही मोठा गोंधळ झाला आहे.दरम्यान कृषी सहाय्यक बेपत्ता झाल्याचे चित्र. दिसून येत आहे. साखरखेर्डा या भागात नियुक्त कर्मचारी कोठे आहेत ? याचा शोध केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी उठत आहे.

साखरखेर्डा,शेंदुर्जन आणि मलकापूर पांग्रा अशी महसूलची तीन मंडळे या भागात आहेत . तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिंदखेडराजा येथे असून उपकार्यालय दुसरबीड येथे आहे. पुर्वी हे तालुका कृषी उपकार्यालय साखरखेर्डा येथे असतांना काही अधिकाऱ्यांनी आपल्या सोयीसाठी दुसरबीड येथे हलविले . तेथे कोठेही कृषी विभागाचे अधिकारी राहातं नाही . सिंदखेडराजा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच बसून कृषी पर्यवेक्षक , कृषी सहाय्यक आपला कारभार हाकत आहेत . अतिवृष्टी , पिकावर येणारे रोग , दुष्काळ , शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन , शासकीय योजनेची माहिती ही शेतकऱ्यांना मिळत नाही , किंवा दिली जात नाही . तीन वर्षांपूर्वी समाधान वाघ या कृषी सहाय्यकाचे प्रमोशन झाले . त्यांची बदली झाली . त्यांच्या सोबत कृषी पर्यवेक्षक म्हणून जितेंद्र सानप यांनीही उत्कृष्ट मार्गदर्शन करीत शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला . गेल्या तीन वर्षांपासून साखरखेर्डा भागातील कृषी पर्यवेक्षक कोण आहे , कृषी सहाय्यक कोण आहे हे शेतकऱ्यांना माहीत नाही . काही योजनेची फाईल भरावयाची असल्यास सिंदखेडराजा येथे जावे लागते. तेथे कृषी सहाय्यक , कृषी अधिकारी मिळत नाही . दौऱ्यावर गेल्याची माहिती दिली जाते. आज साखरखेर्डा , गुंज , मोहाडी , राताळी , सवडद , वरोडी , पिंपळगाव सोनारा , शिंदी , तांदुळवाडी, बाळसमुंद्र , जागदरी , आंबेवाडी , कंडारी , भंडारी , राजेगाव , उमणगाव , सायाळा , दरेगाव येथील शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक सापडत नाही . युरीया खतांची कुत्रिम टंचाई निर्माण करुन शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे.

▪️पिक विम्याची रक्कम मिळाली नाही

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आज पर्यंत विम्याची रक्कम मिळाली नाही . रब्बी हंगामात हरबरा पिकाचा विमा काढलेल्यांना विमा मिळत आहे परंतू काहींना लाभ काही हातचोळत आहे. साखरखेर्डा येथील शेतकऱ्यांनी थेट कृषीमंत्री ना . धनंजय मुंडे यांच्याकडे तक्रार केली आहे.

▪️कोण काय म्हणते?

साखरखेर्डा येथील कृषी कार्यालय पुर्ववत सुरु करा.
साखरखेर्डा , शेंदुंर्जन , मलकापूर पांग्रा या तीन जिल्हा परिषद आणि मंडळासाठी साखरखेर्डा येथे कृषी कार्यालय सुरू करावे . त्यांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल . अशी मागणी आपण केंद्रीय मंत्री ना प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे.

– मोरे , माजी समाजकल्याण सभापती , तथा उपजिल्हाप्रमुख शिवसेना
—————————————-
▪️साखरखेर्डा भागातील कृषी सहाय्यक , कृषी पर्यवेक्षक यांनी साखरखेर्डा येथे थांबून शेतकऱ्यांची समस्या सोडवावी . अन्यथा आंदोलन करण्यात येईल . – दिगंबर खरात माजी सैनिक साखरखेर्डा

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!