बुलढाणा (हॅलो बुलढाणा) निरोगी आरोग्यासाठी प्रशासकीय यंत्रणा डोज पाजते.परिसर स्वच्छ ठेवा.. स्वच्छता बाळगावी,असे. आवाहन करते.परंतु प्रत्यक्षात प्रशासकीय यंत्रणाच आपले कर्तव्य विसरत आहे.हॉटेल राधिका परिसर ते ॲडिशनल कलेक्टर यांच्या घरापर्यंत प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे.याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न ७ ते ८ वर्षापासून विचारला जात आहे.
शहरातील हॉटेल राधिका जवळील भाग ते ॲडिशनल कलेक्टर यांच्या घरापर्यंत घाणीचे साम्राज्य नांदत आहे.विशेष म्हणजे नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे येथे नाली बांधकाम झाले नाही.परिणामी गट ७ ते ८ वर्षापासून दुर्गंधीयुक्त पाण्याचा शिरकाव नागरिकांच्या घरात आणि क्वार्टरमध्ये दर पावसाळ्यात होतो.
या गंभीर समस्येकडे नालीसफाईसाठी नगरपालिका पुढे येत नाही.तर नगरपालिका बी ॲन्ड सी कडे बोट दाखवून सदर काम ठेकेदाराचे आहे म्हणून सांगते.या घाणीच्या त्रासामुळे सरकारी कॉर्डर आणि बंगले अनेकांनी सोडले आहेत.














