मेहकर (संतोष अवसरमोल/हॅलो बुलढाणा) रस्ता झालाच पाहिजे… झालाच पाहिजे.. अशी घोषणा देत घाटबोरी येथील दोन युवकांनी चक्क रस्त्यावरील चिखलातून लोटांगण घातले. या आंदोलनात ग्रामपंचायत चा निषेध नोंदविण्यात आला चिमुकल्या मुलांनीही आंदोलनात सहभाग दाखविला.
मेहकर तालुक्यातील घाटबोरी या गावात विविध समस्या आहेत. रस्त्याची पूरती दैन्यवस्था झाली आहे. ग्रामपंचायत याकडे दुर्लक्षित आहे. रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षापासून जैसे- थे च असल्याने आज
घाटबोरी येथील अंकुश श्रीराम राठोड व राजू तुकाराम कुसळकर या युवकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चप्पल रस्त्यावरील चिखलातून लोटांगण घालत ग्रामपंचायत चा निषेध नोंदवला. या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान
गावपुढाऱ्यांच्या हेकेखोर राजकारणामुळे या रस्त्याची चाळण झाली. ग्रामपंचायतीने लाखो रुपयांची करवसुली करून सुद्धा गावात घाणपाण्याच्या गटारी साचलेल्या आहेत. रस्त्यावर अनेकदा दुचाकी वाहने किंवा पायी चालणारे घसरुन पडावे अशी परिस्थिती आहे. रस्त्यावर दुर्गंधीयुक्त चिखल व दलदल वाढत आहे. त्यामुळे डास, व दुर्गंधीचा त्रास वाढुन आरोग्याची बाधित होण्याची भीती वाढली आहे.
▪️ रस्ता कुणाच्या अखत्यारीत?
रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार ग्रामपंचायतीला गावकऱ्यांनी मागणी केली आहे. मात्र, ग्रामपंचायत सरळ म्हणते हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो म्हणून हात झटकून बाजूला होतात. आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी केली असता, बांधकाम विभाग म्हणतोय आमच्याकडे निधी उपलब्ध नाही. पण गावच्या हद्दीतील गावकऱ्यांचा दळणवळणाचा मधोमध वस्तीमध्ये महत्वाचा रस्ता आहे. तर ग्रामपंचायतीला साधा दोन-चार ट्रिप दगड, मुरुम टाकून दुरुस्ती करतायेत नाही का? त्यामुळे नेमका हा रस्ता दुरुस्ती कोणी करावा, कोणाच्या अखत्यारीत येतोय, याचं प्रश्नांनी आता अक्षरशः गावकरी रस्त्यासाठी त्रस्त झाले आहेत.