spot_img
spot_img

इशारा! बुलढाणा आगार प्रवेशद्वारावर संयुक्त कृती समितीचा घंटानाद!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुलढाणा आगार प्रवेशद्वारावर संयुक्त कृती समितीने घंटानाद आंदोलन केले.

एस.टी. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी
९ ऑगस्ट २०२४ पासून सुरु होणा-या धरणे आंदोलनाबाबत शासनाला यापूर्वी निवेदन देण्यात आले आहे. रा.प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर ११.९.२०२३ रोजी शासन पातळीवर झालेल्या बैठकीत
महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीच्या वाढीव दराच्या थकबाकीबाबत मा. मुख्यमंत्री यांच्या
अध्यक्षतेखाली मा. उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त व नियोजन, मा. उद्योग मंत्री यांच्यासह संघटनेच्या प्रतिनिधीसमवेत
१५ दिवसात बैठक घेऊन निर्णय घेण्याचेही सदर बैठकीत मान्य केलेले होते. परंतु असा निर्णय होऊन ९ महिन्यापेक्षा
जास्त कालावधी उलटून गेलेला असतानाही सदरची बैठक अद्याप झालेली नाही. त्यामुळे मा. मुख्यमंत्री यांच्या
अध्यक्षतेखाली अशी बैठक तात्काळ आयोजित होऊन रा. प. कामगारांना सदरची थकबाकी मिळणे अपेक्षित आहे. दरम्यान या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज घंटानात आंदोलन करण्यात आले.
बुलडाणा आगारात मान्यताप्राप्त कामगार संघटनाचे राजेंद्र पवार, मो.सरफराज, सतीश गोंधळी,सचिन खिर्डेकर कामगार सेनेचे गजानन माने, विजय पवार ,संजय उबरहंडे,
संदीप डुकरे,बबन चव्हाण बहुजन परिवहन संघटनाचे देविदास अंभोरे,कुंदन गवई, अंबादास खरे, रत्नदीप हिवाळे,कास्तराईब संघटना चे जितेंद्र साळवे,दीपक मिसाळकर ,रवी अवसरमोल, बी बी आराख,नरेंद्र खरे
तसेच राजेश आगाशे, दहिभ जण ,आराख
व इतर सर्व संघटना चे पदाधिकारी व कामगार बांधव महिला कामगार भगिनी उपस्थित होते.
संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून सर्व संघटना एकत्र आल्या असून शासकीय कामगार वर्ग प्रमाणे पगारवाढ मिळण्यासाठी 9 ऑगष्ट पासून बेमुदत तीव्र धरणे आंदोलन मध्ये 100% सहभाग नोंदविण्यचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!