बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अशा दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने राबवल्या जात आहेत असं वारंवार सरकारकडून सांगितलं जातं आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
तत्पूर्वीच दोन बेपत्ता मुलांची अपहरण करून निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. आता एका 17 वर्षीय मुलीला फूस लावून पळविल्याची माहिती समोर आली.
मुलगी कोणत्या गावात राहते आणि तिचे नाव काय ही माहिती आम्ही देऊ शकत नाही. परंतु फुस लावून मुलीला पळविण्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहे.एक 17 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली.गजानन संतोष शिंदे रा.खापरखेडा ता.
मोताळा हा संशयित आरोपी आहे. एका 17 वर्षीय मुलीला कायदेशीर रखवालीतून अज्ञात कारणासाठी आरोपीने फुस लावून पळविले. याबाबतची तक्रार पोलीस आणि स्टेशनला दाखल झाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून होत आहे.