बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिक्षण सप्ताह अंतर्गत येथील प्रबोधन विद्यालयात शैक्षणिक,सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये जोश भरला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ या कालावधीतिल शिक्षण सप्ताह मोठया उत्साहात साजरा होत आहे.आज पावसाचे वातावरण असतानाही सकाळी शाळेमध्ये ९५% उपस्थिती आढळून आली ही किमया फक्त गेल्या सोमवार पासून शिक्षण सप्ताह अंतर्गत घडत आहे. प्रत्येक दिवस उत्साह घेऊन येत आहे. आज दिनांक २६ जुलै २०२४ ला ‘ सांस्कृतिक दिवस ‘ प्रबोधन विद्यालयात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे इयत्ता 7 ब च्या विद्यार्थ्यांनी आजचा दिवस गाजवला. वर्गशिक्षिका नयना राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमोपचार, बाजारातील भाजीपाल्यांच्या भाव वाढी संदर्भातील दुजाभाव, हस्तकला, चित्रकला, विविध नाट्य प्रयोग आदी विषयांना विद्यार्थ्यांनी हात घातला. गेल्या २३ जुलै मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, २४ जुलै क्रीडा दिवस,२५ जुलै सांस्कृतिक दिवस
२६ जुलै कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस,
२७ जुलै इको क्लब उपक्रम आणि शालेय पोषण दिवस,
२८ जुलै समुदाय सहभाग दिवस असे उपक्रम प्रबोधन विद्यालयात साजरे करण्यात येत आहे.