बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येथील जयस्तंभ चौकात कुलवामा येथे झालेल्या हमल्यात शहीद जवानांच्या विरपत्नींच्या शुभहस्ते लोकार्पण झालेले संविधान प्रस्ताविका पुनःस्थापित करुन त्या विरांना सन्मान बहाल करुन देण्याची मागणी माजी सैनिक तथा नागरिकांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना केली आहे.
निवेदकांनी म्हटले की, सदर विषयाच्या आणि शहीद दिनाच्या अनुषंगाने 1 सप्टेंबर 2019 रोजी नियमानुकूल सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन बुलढाणा येथे जयस्तंभ चौकात भारतीय संविधानाचा प्रचार, प्रसार हेतू व्यापक व देशहिताचे दृष्टीने जनमाणसांमध्ये संविधान संस्कार रुजविणे व नागरीक हे संविधान साक्षर व्हावेत या दृष्टीने प्रस्ताविका स्थापीत करण्यात आली होती. संविधानाप्रती या उद्दात्त भावनेतून जिल्हयाचे सुपूत्र संजय राजपूत रा. मलकापूर व नितीन राठोड रा. चोरपांग्रा या विरजवांनाना समर्पित करण्याकरीता व त्यांच्या स्मृती आपल्यात चिरकाल राहण्याकरीता स्मृतीचिन्ह म्हणून विरपत्नींच्या शुभहस्ते प्रस्ताविकेचे लोकार्पण करण्यात आले होते. आज रोजी त्या गैरवान्वीत करणाऱ्या शहीदांच्या स्मृती व त्या घटनाक्रमाचे वर्णन व साक्ष देणारी शिळा आणि संविधान प्रस्ताविका सदर जागेतून हटविण्यात आली आहे ते पुर्नस्थापीत करण्यात यावे याकरीता आमरण उपोषणसुध्दा करण्यात आले. दरम्यान लिखीत आश्वासन
दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यासर्व बाबी लक्षात घेता या अप्रिय घटनेस जबाबदार नगरपरिषदचे प्रशासन,प्रशासक यांचे हे कृत्य पद, प्रतिष्ठेला शोभणारे नाही हे स्पष्ट होते.पुढे निवेदनात म्हटले आहे की, अनेकदा लिखीत व मौखिक स्वरुपात स्मरण करुन दिले असतांना सुध्दा प्रशासक हे नवाबशहा सारखे वागत असल्याचे दिसून येते. काढून टाकण्यात आलेली संविधान प्रस्ताविका व शिळा पुर्वस्थितीत दर्शनी भागात पुनःस्थापीत करुन शहीदांच्या स्मृतींची जपणूक करावी व जिल्हयास गतवैभव
प्राप्त करुन दयावे. येत्या 1 सप्टेंबर 2024 ला लोकापर्णास 5 वर्ष पूर्ण होत आहेत. 1 सप्टेंबर
पर्यंत संविधान प्रस्ताविका स्थापित न झाल्यास संवैधानिक मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल.
उद्भवणाऱ्या प्रसंगाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा शासन व प्रशासनाची असेल. असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर माजी सैनिकांसह नागरिकांच्या सह्या आहेत.