चांडोळ (हॅलो बुलढाणा) विदर्भ मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या जाळीचादेव अजिंठा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या डोंगराळ भागात पाऊस सतत पडत असल्याने सध्या या भागात डोंगर दऱ्यानी हिरवा शालू परिधान केला असून, डोळ्याचे पारणे फिटेल असे नयनरम्य दृश्य आहे. येथील 4 पर्यटनस्थळावरील या डोंगराळ परिसरात आखाड महिना असल्याने खवय्यांच्या ओल्या- सुक्या पार्ट्या देखील रंगत आहे.
परिसराला कालिंका माता परिसर,व जाळीचादेव हा मोठा डोंगराळ भाग आहे. पावसाळा सुरू असल्याने त्यात या भागात पाऊस पडत असल्याने हा भाग नयनरम्य झाला आहे. पावसामुळे येथील विविध प्रकारची झाडे झुडुपे बहरली. डोंगराळ भागातील छोटे मोठे धबधबे वाहत आहे. तलावात पाणी साचले आहे.सगळीकडे हिरवळ पसरली आहे.हिरवाईवर पशु चरत आहेत. तर गवतांवर, वेली फुल व झाडांवर बसून पक्षी चिवचिवाट करत आहे.हे दृश्य नक्कीच सुखावणारे आहे. येथील डोंगराळ भागातील डोंगराच्या कुशीत असलेले कालिंका माता मंदिर सभोवतालचा व डोंगराच्या उंच टेकडीवर असलेल्या सभोवतालच्या खोल दऱ्या आणि जाळीचादेव मंदिर परिसर सुद्धा बघण्यासारखा झाला आहे. हा भाग हिरवाईने नटल्याने सुंदर पर्यटन स्थळाप्रमाणे भासत आहे.अगदी तासनतास येथे प्रत्येकजण रमून जाईल असा हा परिसर दिसतो आहे.दरवर्षी येथे आसपासच्या परिसरातून हजारो पर्यटक येत असतात यंदा देखील या भागात पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
▪️डोंगराळ भागात पार्ट्या जोरात!
नयनरम्य हिरवाई त्यात आखाड महिना म्हणजे पर्वनीच त्यामुळे या भागात हिरव्यागार डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर खवय्ये पार्ट्या करताना दिसून येत असून परिसरातील युवक,अगदी बुलढाणा पासून पर्यटक येथे येत आहे.सगळीकडे ओल्या किंवा सुख्या पार्ट्या रंगताना दिसून येत आहे.
▪️ ही पर्यटनस्थळ पाहण्यासारखी!
मराठवाडा- विदर्भ समिरेषेवरील 10 किलोमीटरच्या आत 4 पर्यटनस्थळ पाहण्यासारखीआहे.2 मराठवाडयात 2 विदर्भात आहे.त्यात मराठवाडयातील भोकरदन तालुक्यातील जाळीचादेवाचे मंदिर, डोंगारातील दरीच्या किनाऱ्यावरील कालींकामाता मंदिर तर विदर्भातील बुलढाणा तालुक्यातील प्रसिद्ध असलेले बुद्धनेश्र्वर येथील महादेव मंदिर, दावनेश्वर येथील डोंगाराच्या कुशीतील मंदिर पर्यटकासाठी निसर्गाचा आनंद लुटण्या सारखे आहे.