बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मित्रांसोबत हास्यविनोद करीत असतात. परंतु कधीकधी हास्य विनोद महागात पडतो. अशीच एक घटना अंभोडा येथे समोर आली असून, मित्रानेच मित्राची मजाक केली म्हणून डोक्यात सरळ लोखंडी रॉड घातला. गणेश सांडुरामा पवार, गजानन पंढरी पवार,विठठल पंढरी पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत 24 जुलै रोजी जिवन गणेश तायडे रा. अंभोडा ता जि बुलडाणा यांनी तक्रार दिली की,
मला एक भाउ मोहन गणेश तायडे हा असुन तो नोकरीनिमीत बाहेरगावी आहे. गावात
गणेश सांडुरामा पवार हा माझा मित्र असुन तो अंभोडा येथेच राहतो. गणेश सांडुरामा पवार याने आठ महीण्यापुर्वी घरुन निघुन जावुन लग्न केले होते. परंतु त्याची बायको त्याला सोडुन माहेरी गेली असल्याने मी त्याची आज 24 जुलै रोजी दुपारी 04/30 वा. मजाक केली होती.
दरम्यान संध्याकाळी मी माझ्या मित्रासोबत
अंभोडा गावातील झरी रस्त्यावर गप्पा मारत उभा होतो. त्यावेळी तेथे गावातील माझा मित्र गणेश सांडुरामा पवार, गजानन पंढरी पवार व विठठल पंढरी पवार हे आले. गणेश सांडुरामा पवार हा हातात लोखंडी रॉड घेवुन आला होता. तो मला म्हणाला की, तु माझी कॅन्टीनमध्ये मजाक का केली असे म्हणुन त्याने त्याचे हातातील लोखंडी रॉड माझ्या डोक्यात मारुन मला जखमी केले तसेच गजानन पंढरी पवार व विठठल पंढरी पवार या दोघांनी मला चापटाबुक्क्यांनी खाली जमीनीवर पाडुन
मारहाण केली व शिवीगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी दिली आहे. त्यावेळी तेथे माझा मित्र अंकुश वसंतराव तायडे, अरुण साहेबराव खंडारे व गजानन प्रभाकर पवार हे तेथे हजर होते. त्यांनी मला त्यांचे तावडीतून सोडविले आहे.