बुलढाणा (हॅलो बुलढाणा) माजी नगराध्यक्षा उज्ज्वलाताई काळवाघे यांचे पति बंडू उर्फ गजानन काळवाघे यांना लुटी प्रकरणी पुण्यात अटक झाली आहे. राहू – चौफुला (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गा वरील हॉटेल रघुनंदन येथे जेवणासाठी थांबलेल्या शरद मधुकर डांगे, त्यांची सून आणि व्याही (रा. चैतन्यवाडी बुलढाणा) या कुटुंबीयाला चाकूचा दाखवून त्यांच्यासोबत असलेल्या बंडू उर्फ गजानन काळवाघे (वय-40 वर्ष) रा. चैतन्यवाडी, जि. बुलढाणा याने जबरदस्तीने चाकूचा धाक दाखवून चारचाकी गाडीतील अर्धा कोटी रुपयांची बॅगेमधील रोकड 23 जुलैच्या रात्री पळवून नेल्याची घटना घडली आहे. डांगे कुटुंब कर्नाटक येथून पुण्याच्या दिशेने चालले होते. दरम्यान चौफुला येथे जेवणासाठी थांबले असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
- Hellobuldana