चिखली (हॅलो बुलढाणा) मेहकर तालुक्यातील एका गावातील वृद्ध माऊली त्यांना चार अपत्य दोन मुलं दोन मुली असून ते आपल्या जन्म दात्याआईचा सांभाळ करीत नव्हते. त्यांच्या कडे 10 एकर शेती होती. ति शेती तिने दोन्हीही मुलांना वाटून दिली. त्यानंतर मुलांनी त्या वृद्ध माऊलीला घरा बाहेर काढून दिले होते. ती मेहकरला आली तिची भेट सामाजिक कार्यकर्त्यां सौं जयाताई जयधे व दशरथ वाघ व चिखली येथील आंबेडकरी चळवळीचे विजयकांत गवई यांच्या माध्यमातून तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी त्या निराधार वृद्धमाऊली जबाबदारी स्वीकारली होती. परंतु या वृद्ध माऊलीची बातमी प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होताच तिच्या मुलांनी वृद्धाश्रमात धाव घेतली व आईची क्षमा याचना करून नीट सांभाळ करण्याची इच्छा व्यक्त केली. तदनंतर वृद्धाश्रमा च्या वतीने संचालक प्रशांत डोंगरदिवे, रुपाली डोंगरदिवे, सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे पाटील यांनी दोनीही मुलांचे समुपदेशन करून व त्यांचे लेखी पत्र घेण्यात आले. तिला घेण्यासाठी मुल आले त्यांना पाहताच आईचे आनंदाश्रू थांबत नव्हते. तिला खूप आनंद झाला तिने मुलांसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्या वृद्ध माउलीला तिच्या मुलांसोबत स्वगृही रवाना करण्यात आले.
- Hellobuldana