बुलढाणा (हॅलो बुलढाणा) फेसबुक वरील काही पोस्ट विचार मंथन करायला लावतात अशीच श्री मिलिंद चिंचोळकर यांची पोस्ट जशीच्या तशी देत आहोत..
हुश्शsss आपला ४ दिवसीय दौरा आटोपून कृष्णप्रकाश साहेब बुलडाणेकरांचा जड अंत:करणाने निरोप घेऊन पुढील कर्तव्यांसाठी गेले आपण चार दिवस बुलडाणा शहरात असताना आम्ही बुलडाणा शहर वासीयांनी आपल्या दु:खऱ्या आणि न दाखवता येणाऱ्या बाबी लपवून ठेवल्या आणि साहेबांचा यथार्थ पाहुणचार केला… माननीय कृष्णप्रकाश साहेब आपण बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक असताना जो बुलढाणा सोडून गेलात आणि काल गेलात त्या बुलडाणा शहरात फार मोठा फरक झाला आहे हे आपणास कोणीही सांगितलं नसेल आणि सांगणारही नाहीत.. अनेक श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबाशी संवादात कौटुंबिक खेळकर वातावरणात रमलेले असताना कटू विषय हाताळणे योग्यही नाही… मात्र आपण शहरात असताना पोलिसांमुळे म्हणा किंवा स्वयंप्रेरणेने सर्व अवैध धंदे बंद ठेवले…एका गोष्टीचे कौतुक करायला हवे जिल्ह्यातील प्रत्येक शहरात ड्रग अमली पदार्थ जुगार व्यवसाय प्रतिष्ठाने स्वयंप्रेरणेने बंद ठेऊन आपल्या कार्या विषयी आदरांजली आम्ही वाहिली आहे…आपणास एक विनंती आहे की निवृत्तीनंतर कृपया बुलढाणा शहराचे नागरिक व्हा इथे रहायलाच या त्यासाठी आपण वारंवार जिल्ह्यात आलात तर महिलांना सुरक्षा मिळेल जेष्ठनागरिकांनी शांतता प्रेमी नागरिकांना दिलासा अधून मधून का होईना मिळत राहील…आपण इकडे असलात की प्रत्येकजण आपली ड्युटी चोखपणे पार पाडणार…परवा महावीर नगर सारख्या उच्चभ्रू कॉलनीतील एका दुकानदार महिलेची सोन्याची चैन जबरीने खेचून घेण्याचा जो प्रकार झाला एवढं एक गालबोट या दौऱ्याला लागायला नको होतं असो आपले खूप खूप धन्यवाद आपण आपल्या SP असताना अनेक अवैध व्यावसायिक लोकांना वैध व्यवसायात उभे करण्याचे कार्य केले हे मी विसरू शकत नाही हे आमच्यावर फार मोठे उपकार आहेत याची परतफेड शक्य नाही निदान या जन्मात तरीही 🙏☺️🌹 #ipskrishnaprakash