10.9 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

संदीप शेळके स्वैर पक्षी,बंधनात टिकणार का ? संदीप शेळके यांचा शिवसेना उबाठा गटात प्रवेश, काय असतील राजकीय समीकरणे?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा / राजेंद्र घोराडे) लोकसभा निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी एक व्हिजन घेऊन वन बुलढाणा मिशनची स्थापना करणारे व लोकसभा निवडणूक लढवणारे संदीप शेळके यांनी नुकतेच मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवबंधन हातात बांधले आहे.आगामी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदीप शेळके यांनी हे पाऊल उचललेले असले तरी त्यांच्या या कृतीमुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये काय राजकीय समीकरणे उदयास येतील, याचा कयास लावला जात आहे.

संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी ही अतिशय प्रभावी होती परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना गुलीगत धोका दिला, त्याची प्रमुख कारण संदीप शेळके यांच्याजवळ कार्यकर्त्यांची फौज नसून केवळ कर्मचाऱ्यांचा फौज फाटा होता, कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी तर कर्मचारी फक्त नोकरीसाठी काम करतात, संदीप शेळके आणि मालती शेळके दोघांनीही कर्मचाऱ्यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या, त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश आले पण तरीही, संदीप शेळके हे नाव जिल्हाभरात राजकीय पटलावर उदय पावले, ही चर्चा गावोगावी झाली.कदाचित संदीप शेळकेंचा उद्देश फक्त हाच असावा.

पण लोकसभा व विधानसभा दोन्हीही निवडणुकांची राजकीय गणिते वेगळी असतात त्यातच संदीप शेळके यांनी जर उभाठा गटाकडून निवडणुकीसाठी एबी फॉर्म खेचून आणला तर विधानसभा निवडणुकीमध्ये ते डार्क हॉर्स ठरू शकतात.निष्ठावंत शिवसैनिकांची हजारो लोकांची फळी एका शिवबंधनाने त्यांनी क्षणात आपल्या सोबत बांधून घेतली आहे.

संदीप शेळके यांच्यासारखा स्वैर पक्षी स्वतःला शिवबंधनात बांधून घेतो हे ठीक तरी,आदेशाची ,बंधनाची सवय नसलेले संदीप शेळके या शिवबंधनात टिकतात का? व टिकले तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये काय जादू घडून आणतात हे पाहणे खरंच पर्वणी ठरेल.

त्यांच्या राजकीय हालचाली पुढील दोन महिन्यात सर्व काही कळेलच,संदीप शेळके यांच्या रूपाने नवीन दमाचे, नवीन व्हिजन असलेले, नवीन नेतृत्व उभे राहत असेल तर त्यांना शुभेच्छा.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!