10.9 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

भ्रष्टाचाराची चौकशी करा अन्यथा जोडे मारो आंदोलन – प्रशांत वाघोदे

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) समाज कल्याण आयुक्त, पुणे यांना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बुलढाणा यांच्या मार्फत वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांच्या नेतृत्वात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे तथा योजने अंतर्गत झालेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करुन कारवाई करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी तथा योजने अंतर्गत झालेल्या गैरव्यवहाराबाबत अनेक निवेदन, आंदोलन आणि उपोषण मागील काही काळापासून केले असून त्यांनी दिं. 16 नोव्हेंबर 2022 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे कार्यालयासमोर उपोषण केले होते व त्या उपोषणाची दखल घेऊन मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बुलडाणा यांनी उपोषणकर्ते यांना भेट देऊन केलेल्या मागणीनुसार व दिलेल्या पत्रान्वये श्री. मनोज मेरत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. बुलढाणा यांच्याकडील प्रभार काढण्यासाठी मा.आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे यांना प्रस्ताव सादर करण्यात येईल तथा सदर तक्रारीची चौकशी करण्यासाठी मा.प्रादेशिक उपायुक्त,अमरावती यांना प्रस्ताव सादर करण्यात येईल, या लेखी आश्वासनावर उपोषण मागे घेणेबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले होते, दरम्यान जि.प.बुलढाणा अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रान्वये व प्रस्तावानुसार मा.आयुक्त समाज कल्याण, पुणे हे मुद्यांच्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरणाची चौकशी करण्याकरिता चौकशी समिती गठीत करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते, ज्यामध्ये दि.18 नोव्हेंबर 2022 रोजी आदेश पारीत करण्यात आला आहे असे तोंडी सांगण्यात आले होते, मात्र सदर प्रकरणात गेल्या 20 महिन्याच्या कालावधीमध्ये कुठल्याच प्रकारची चौकशी करण्यात आली नाही. विशेष म्हणजे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा जिल्ह्यात सदर योजनेत खुप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असुन तरी सुद्धा प्रशासन संबंधित अधिकारी यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहे.
वरील विषयी स्मरणपत्र म्हणुन 30 दिवसांच्या आत कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने मा.समाज कल्याण अधिकारी श्री.मनोज मेरत व तात्कालीन अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजेश लोखंडे यांच्या विरोधात जोडे-मारो आंदोलन छेडण्यात येईल असा सज्जड इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, बुलढाणा शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे, जिल्हा नेते संघपाल पनाड , बुलढाणा तालुकाध्यक्ष मनोज खरात, मोताळा तालुकाध्यक्ष समाधान डोंगरे, चिखली तालुकाध्यक्ष संजय धुरंधर, मलकापूर तालुकाध्यक्ष सुशील मोरे, नांदुरा तालुकाध्यक्ष अजाबराव वाघोदे, चिखली शहरध्यक्ष बाळु भिसे, जि.सदस्य शेषराव मोरे, कु.उ.बा.स.बांधकाम सभापती प्रविण भिडे, अजय सावळे, अनित्य घेवंदे, अरुण सरदार, युवा आघाडी जि.उपाध्यक्ष गिरीश उमाळे, विजय राऊत, दिलीप राजभोज, प्रा.मिलींद मघाडे, अब्दुल हम्मीद, अब्दुल नवेद , गजानन गवई, सचिन वानखडे , संदिप लहाने, प्रदिप वाकोडे, अर्जुन बोर्डे,विशाल मोरे, संदिप गवई, भिमराव नितोने, शेषराव उमाळे, राष्ट्रपाल खंडारे, नवनीत शिरसाट, विश्वास मेढे, शेख वकील , रामेश्वर सरदार, संतोष पानपाटिल यांच्यासह बहुसंख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!