चिखली (हॅलो बुलढाणा) मृतदेह आढळून आला परंतु तो आहे कोणाचा? याचा शोध घेण्यात येत आहे.१९ जुलै रोजी सायंकाळी ८:२० वाजता, चिखली बस स्थानक प्रवेशद्वाराजवळ कॅन्टीनच्या बाजूला एक अज्ञात वृद्ध व्यक्ती मृत आढळून आली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ७० ते ७५ वर्षे असून, त्यांच्यावर पांढऱ्या रंगाचे फुल बाह्याचे शर्ट आणि काळसर रंगाची फुल पॅन्ट होती. गळ्यात निळा-पांढऱ्या रंगाचा चेक असलेला टॉवेल आणि लालसर रंगाची अंडरवेअर होती. डोक्यावर काळे-पांढरे केस आणि पांढरी दाढी होती.
या घटनेची नोंद साना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद क्रमांक ०४१/२०२४ अंतर्गत कलम १९४ बी.एन.एस.एस. अंतर्गत करण्यात आली आहे.
पोलीसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. तुम्हाला या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती असल्यास, कृपया तातडीने चिखली पोलीस स्टेशनशी संपर्क साधा.