बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शैक्षणिक प्रश्न सुटत नाहीत, पण का सुटत नाहीत आणि यासाठी काय केले पाहिजे? असा शैक्षणिक मुद्दाच नव्हे तर यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प, जालना खामगाव रेल्वे मार्ग होणार कधी? असे महत्त्वाचे मुद्दे भाईजींनी उपस्थित केले.
20 जुलै रोजी नागपूर येथील बुलढाणा जिल्हा मित्र मंडळाने आयोजित सत्कार कार्यक्रमास बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, बुलढाणा अर्बन संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, खासदार अजय संचेती बबनरावजी तायवाडे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. दरम्यान भाईजी यांनी म्हटले की,बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प, जालना- खामगाव रेल्वे मार्ग व सध्या स्थितीतील शैक्षणिक क्षेत्रातील विशेष मुद्द्याला धरून बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात असलेल्या दुर्दशा व परिस्थिती वाईट आहे. बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील विविध विकास कामे व त्यामध्ये होत असलेला विलंब तसेच शिक्षण क्षेत्रामधील पाहिजे असलेले बदल याबद्दल सर्व बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटनांना, पालकांना शिक्षकांना व विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्था यांना समृद्धी कशी आणली जाईल या संदर्भात भाईजींनी मत व्यक्त केले आणि शैक्षणिक क्षेत्र कॉपीमुक्त करण्याबाबत आवाहान केले. सत्काराला उत्तर देताना ना.प्रतापराव जाधव यांनी भाईजी यांनी मांडलेल्या प्रश्नाबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील कामांप्रती ठोस पावले उचलून भविष्यात यावर योग्य मार्ग काढण्यात येईल असे सांगितले.