spot_img
spot_img

नरेंद्र मोदींना हे माहित आहे का? – नळाला दोन थेंब पाणी येईना… म्हणे ‘हर घर जल..’

चांडोळ (हॅलो बुलढाणा/सय्यद सलमान सय्यद नसीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘हर घर जल’ योजनेचा चांडोळ ग्रामीण भागातच नव्हे तर
जिह्यात बोजवारा उडाला आहे. नागरिकांना नळाद्वारे घरात पाणी देण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन फोल ठरले असून, महिलांना रस्त्यावर पाणी भरण्याची वेळ आल्याचे वास्तव समोर आले आहे.

दरवर्षी वर्षभर ग्रामीण भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरीत पाणी असून वीजे अभावी तर तांत्रीक अडचणीमुळे जलसंकटाचा सामना नागरीकांना करावा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.पंधरा -पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी रेन वाॅटर हार्वेस्टिंग’ हा एक चांगला उपाय असून तो काळाची गरज आहे. परंतु नरेंद्र मोदी यांनी आणलेली ‘हर घर जल’ ही योजना आमलात आली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी आजही ग्रामीण तसेच शहरी भागात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!