बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ॲड.जयश्री शेळके यांचे कामच भारी आहे. ते समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जीवाचा रान करतात..
राज्य महसूल कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. याचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासातून जनतेला दिलासा मिळावा यासाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढून त्यांना न्याय मिळावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲड.जयश्री शेळके यांनी विरोधी पक्षनेते मा.विजयजी वडेट्टीवार तसेच विधीमंडळ गटनेते मा.बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा महसूलच्या कामकाजावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत आहे. नायब तहसीलदार ते कोतवालापर्यंत सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आताच नव्याने शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन शाळेत दाखला घेणे, शालेय शिष्यवृत्ती मिळविणे अशा विविध कामांसाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला तसेच इतर महसूली कागदपत्रांची आवश्यकता असते. शासनाने आताच्या अर्थसंकल्पात नव्या योजना जाहीर केल्याने योजनेचा लाभार्थी होण्यासाठी देखील नागरिकांची महसूल कार्यालयांमध्ये गर्दी वाढली आहे. परंतु राज्यभरातील महसूल संघटनांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने अनेक महत्त्वाच्या फायली जागेवरच थांबल्या आहेत. सेतू कार्यालयातून आलेले दाखले सह्यांसाठी पडून आहेत. विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांना काम पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत.
त्यामुळे विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांच्या अडचणी विचारात घेऊन महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲड. जयश्री शेळके यांनी विरोधी पक्षनेते मा.विजयजी वडेट्टीवार तसेच विधीमंडळ गटनेते मा.बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.