बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आजचे गुरुजी वेगळेच आहे. बोगसबाजी म्हटलं तरी चालेल. कारण जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यामध्ये कित्येक वर्षांपासून शिक्षक प्रतिनियुक्ती वर अशैक्षणिक काम करत आहेत. दरम्यान
सर्व प्रतिनियुक्त्या जिल्हा परिषद सीईओ जंगम यांनी रद्द केल्या.श्री जंगम यांनी शिक्षकांना मूळ असलेल्या जागेवर जाऊन शाळेत रुजू होण्याचे आदेश दिले आहे. तसे परिपत्रक काढण्यात आले आहे.
जिल्ह्यात 50 पेक्षा अधिक शिक्षक पंचायत समिती व जिल्हा परिषद बुलढाणा कार्यालयात अशैक्षणिक कामे घरीच आहे.अगोदरच बऱ्याच ठिकाणी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी विद्यार्थी व पालकांची शाळेत शिक्षक देण्याची मागणी केली आहे.