बुलढाणा (हॅलो बुलढाणा)‘लाखो लिटर फिल्टर पाण्याचा अपव्यय!’,ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती!,नगरपालिकेला दुरुस्तीला वेळ नाही?’ अशा शीर्षकाची बातमी काही वेळापूर्वीच उमटताच जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी हॅलो बुलढाणा चे आभार व्यक्त करून ‘याला म्हणतात बातमी’ असे कौतुकाने म्हटले.गेल्या आठ दिवसापासून नगरपालिकेची जलवाहिनी ठिकठिकाणी फुटली असून लाखो लिटर फिल्टर झालेल्या पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. एवढेच नाही तर नागरिकांच्या घरात या पाण्याचा शिरकाव होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.
शहरातील चिखली रोड वरून जाताना, राजश्री शाहू बँकेसमोर हे दृश्य पाहायला मिळेल. असे वृत्त उमटल्यानंतर प्रशासन जागे झाले.सदर ठिकाणी जेसीबी द्वारे खड्डा खोदून जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्यात येत आहे.