बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ७२ किमीच्या मलकापूर-चिखली राष्ट्रीय महामार्गाला अखेर मुहूर्त मिळणार तरी केव्हा? हा सवाल जिल्हावासीय करत आहेत.
वास्तव हे आहे की, केंद्र शासनाने या महामार्गासाठी १२०० कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री व खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. अतिक्रमणेही हटवली आहेत. पण तरीही काम सुरू होत नाहीये.
हा रस्ता राज्य शासनाला केंद्राकडे हस्तांतरित करावा लागतो. यासाठी राज्य शासनाला बुलढाणा अर्बनला १४४ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. यात रस्त्याची किंमत १०२ कोटी, डॅमेज व इतर २० कोटी आणि थकबाकीचे २२ कोटी आहेत. हा पैसा दिल्याशिवाय रस्ता NHAI कडे जाणार नाही.७२ किमीचा हा रस्ता मलकापूर-सोलापूर आणि इंदूर-बेंगळुरू महामार्गाला जोडणारा दुवा आहे. हा झाल्यास बुलढाणा शहरातील वाहतूक कोंडी संपणार आहे.
▪️बुलढाणा अर्बनची तयारी..
बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सांगितले की, राज्याकडे एकरकमी निधी नसेल तर हप्त्याने द्यावा, पण रस्ता ताबडतोब हस्तांतरित करावा, आमची तयारी आहे.
▪️आता चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात!
आ. चैनसुख संचेती, आ. संजय गायकवाड, आ. श्वेता महाले आणि खा. जाधव यांनी एकत्रितपणे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.





Total Users : 3698670