spot_img
spot_img

BREAKING बोलेरोतून विषाच्या पूड्यांची तस्करी! जानेफळ पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल २० लाखांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त, एकाला बेड्या!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) प्रतिबंधित पानमसाला तस्करांवर वनविभाग, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे मोठा दणका दिला आहे.
खामगाव ते मेहकर रोड पाथर्डी चेक पोस्ट हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासन व
वनविभाग आणि जानेफळ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १९ लाख ९७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा पथकाने एका महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-28-BB-4789) वाहनाचा पाठलाग करून कारवाई केली. या वाहनातून प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक सुरू होती.
या कारवाईत पोलिसांनी –
१) १२ लाख ४८ हजार रु. किमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला
२) २ लाख ४९ हजार ६०० रु. किमतीची V-01 सुगंधित तंबाखू
३) ५ लाख रु. किमतीचे बोलेरो वाहन
असा एकूण १९,९७,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वैभव सुरेश डमरे, रा. चांदमारी, ता. खामगाव याच्या विरुद्ध जानेफळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ०३८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, २२३ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यासाठी देखील फिर्याद देण्यात आली आहे. सदर कारवाईत वनविभाग बोथा व जानेफळ पोलिसांनी मोलाचे सहकार्य केले. तर अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी अ. सं. भोपाळे यांनी सहायक आयुक्त (अन्न) बुलढाणा पी. एस. पाटील आणि सह आयुक्त (अन्न) अमरावती विभाग स. द. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई पार पाडली.

▪️ यापुढेही कारवाईचा बडगा!

प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!