spot_img
spot_img

Exclusive! शिवनी आरमाळच्या घरकुल कामांची चौकशी! विलंबानंतर चार सदस्यांचे पथक; अनियमितता आढळल्यास दोषींवर ठपका निश्चित करण्याचे आदेश!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) शिवनी आरमाळ येथील घरकुल कामांबाबतच्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने चार सदस्यांचे पथक नियुक्त केले आहे. प्रधानमंत्री आवास, रमाई आवास आणि मोदी आवास योजनांतील सन २०२४-२५ ते २०२६-२७ या कालावधीतील कामांची तपासणी होणार आहे.

तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी अशोक रामेश्वर जायभाये यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. विहित मुदतीत चौकशी न झाल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागण्यापूर्वीचा अंतिम अर्ज दिला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी १९ सप्टेंबरच्या आदेशाद्वारे चौकशी पथक नेमले.

सिंदखेड राजा येथील गटविकास अधिकारी अजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली चिरायु राजपूत, गिते आणि सचिन पाटील चौकशी करणार आहेत.

तक्रारकर्त्याच्या उपस्थितीत मुद्देनिहाय चौकशी करून, अनियमितता आढळल्यास संबंधितांची नावे आणि नेमके दोषारोप निश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. पथकाला १५ दिवसांत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आवश्यक कागदपत्रे पुरविण्याची जबाबदारी देऊळगाव राजा गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. आता चौकशीतील निष्कर्षांकडे लक्ष लागले आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!