spot_img
spot_img

BIG BREAKING! ‘ट्रकमध्ये आरडीएक्स, गाडी नागपूरकडे!’ रात्री डायल ११२ वर फोन अन् खामगाव पोलीस धावले; कॉलर सापडताच उलगडलं ‘त्या’ कॉलमागचं गुपित! १३,५०० रुपयांच्या मजुरीचा वाद अन् स्फोटकांची खोटी खबर; ट्रकचालकावर गुन्हा दाखल!

खामगाव (हॅलो बुलढाणा) ‘एका ट्रकमध्ये आरडीएक्स भरून नागपूरकडे नेले जात आहे!’ डायल ११२ वर आलेल्या या माहितीने खामगाव ग्रामीण पोलिसांची धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी कॉलरला शोधून चौकशी करताच या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. मजुरीच्या वादातून ही खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले.

२८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कर्तव्यावर असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण राऊत यांना ही माहिती मिळाली. त्यांनी तातडीने टेंभुर्णा फाटा गाठला; मात्र संबंधित ट्रक आढळला नाही. कॉलरही व्यवस्थित माहिती देत नसल्याने संशय वाढला.

मोबाईल क्रमांकाच्या आधारे शोध घेत पोलिसांनी संजय हरीसिंग यादव (वय ४१, रा. मनीषनगर, नागपूर) याला टेंभुर्णा फाटा येथे ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मुंबईहून माल घेऊन दोन सहकाऱ्यांसोबत नागपूरकडे निघाल्याचे सांगितले. मजुरीचे १३,५०० रुपये घेण्यावरून वाद झाल्यानंतर सहकाऱ्याने त्याला ट्रकमधून उतरवून पुढे प्रयाण केल्याचेही त्याने सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, मद्यप्राशन केलेल्या यादवने ट्रकमधून आरडीएक्स नेले जात असल्याची खोटी माहिती दिली होती. राऊत यांच्या फिर्यादीवरून व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २१७ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ८५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!