खामगाव (हॅलो बुलढाणा) राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान पोलिसाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली दाखल खटल्याचा निकाल आला आहे. खामगाव न्यायालयाने मुजाहिद शहा हारून शहा आणि शेख राजिक शेख युसुफ यांची निर्दोष मुक्तता केली.
१८ नोव्हेंबर २०२२ रोजी शेगावच्या मुरारका हायस्कूल परिसरात गर्दीतून मोटरसायकल चालविणाऱ्याला हटकले असता शिवीगाळ, दमदाटी आणि कॉलर पकडून मारहाण केल्याची फिर्याद पोलीस कर्मचारी अंकुश गोरे यांनी दिली होती. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश कोकरे यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी निकाल दिला. आरोपींतर्फे ॲड. तरुणकुमार विजयसिंह मोहता यांनी काम पाहिले.





Total Users : 3679603