बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘शेतात फवारणी करताना एकाचा मृत्यू! 2 महिलांसह युवक गंभीर!’अशी बातमी ‘हॅलो बुलढाणा’ ने सर्वप्रथम ब्रेकिंग केली. बातमी उमटताच कृषी विभागाने ‘फवारणी करताना काळजी घेण्याच्या आवाहनाचे माहितीपत्रक प्रसिद्धी माध्यमाकडे पाठविले आहे. तत्पूर्वी ही ‘हॅलो बुलढाणा’ने यासंदर्भात जागर केला आहे.
धामणगांव बढे येथे शेतात मका या पिकावर फीवरी औषध फवारणी करताना विषबाधा होऊन एकाचा आज मृत्यू झाला तर 2 महिला व एक युवक गंभीर असल्याचीही दुर्दैवी घटना घडली. दामोदर जाधव वय 70 असे मृतकाचे नाव आहे. गंभीर झालेल्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहन देवानंद जाधव वय 12, बेबीबाई शिवाजी जाधव वय 57, सुभद्राबाई लक्ष्मण जाधव वय 60 अशी अत्यावस्थांची नावे आहेत. हे सर्व धामणगाव बढे येथील राहणारे आहेत. दरम्यान ही बातमी प्रसिद्ध होताच
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले. डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली किटकनाशके सर्वात विषारी तर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. ही चिन्हे सोपी व सर्वसाधारण, निरक्षर व्यक्तीसाठी समजण्यासाठी असतात. म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली
किटकनाशके कमीत कमी विषारी असतात.
तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही किटकनाशके फवारणीसाठी वापरू नये.फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी वान्याच्या विरूद्ध दिशेने फवारणी करू नये.
फवारणी करतांना संरक्षक कपडे, बुट हात मोजे नाकावरील मास्क इत्यादींचा वापर
करावा, उघड्या अंगाने फवारणी करणे टाळावे. संरक्षण किटचा वापर करावा.संपूर्ण क्षेत्रावर एकाच व्यक्तीकडून फवारणी करून न घेता एका व्यक्ती कडून कमीत कमी क्षेत्रावर फवारणी करावी.एकाच व्यक्तीने जास्त मजूरी मिळावी म्हणून जास्त क्षेत्रावर फवारणी करण्याचे टाळावे.औषधी योग्य त्या प्रमाणात वापरावी. फवारणी करतांना अनेक किटकनाशकांचे मिश्रण करू नये.फवारणी केल्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी,
असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांनी केले आहे.