लोणार (हॅलो बुलढाणा) लोणार तालुक्यातील गायखेड फाटा ते गावापर्यंत रस्ता मंजूर होऊनही रस्ता दुरुस्ती होत नसल्याने, अखेर रास्ता रोको केल्यानंतर रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
रस्ता मंजूर झाला..
ठेकेदाराने कामाची सुरुवात देखील केली परंतु भर पावसाळ्यातच अर्धवट काम सोडून दिल्याने चिखलमय रस्ता त्रासदाय ठरला. त्यात भर म्हणून जल जीवन मिशन योजने अंतर्गत विनपारवाना रस्ता खोदून जलवाहिनी टाकण्यात आली.त्यामुळे रस्त्यावर गटारगंगा साचली.सदर काम तातडीने व अंदाजपत्रका नुसार कारण्याच्या मागणी साठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेने 5 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग मेहकर यांच्याकडे तक्रार केली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने कुठलीही कार्यवाही न झाल्याने 15 जुलै रोजी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित काकडे व मोहन लहाने व सुनील मोरे यांनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली.अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाला भेट देऊन काम चालू करण्याचे आश्वासन दिले परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालीच नाही.
दरम्यान आंदोलकांनी 17 जुलै रोजी रस्ता रोकोची भूमिका घेतल्या नंतर
लेखी आश्वासन देऊन त्वरित रस्ता दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. या आंदोलनात ऑल इंडिया पॅन्थर सेनेने विशेष पुढाकार घेतला होता.