बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राबराब राबून पिकवलेलं सोन्यासारखं पीक डोळ्यांदेखत राख झालं… वर्षभराच्या कष्टांवर पाणी फिरलं… संसाराचा आधारच हिरावला! मात्र दुःखाच्या या वणव्यात माणुसकीची फुंकर घालण्यासाठी अंभोड्याचे भूमिपुत्र शिवाजीराव तायडे देवदूतासारखे धावून आले!
बुलढाणा तालुक्यातील हातेडी येथील शेतकरी राजेंद्र आनंद जाधव यांच्या चार एकरांतील सोयाबीनची सुडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने अंदाजे ३० क्विंटल, म्हणजेच दोन लाखांहून अधिक रुपयांचे संभाव्य उत्पादन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची माहिती मिळताच शिवाजीराव तायडे यांनी क्षणाचाही विलंब न करता राजेंद्र जाधव व विमल जाधव यांना थेट ५१ हजार रुपयांची रोख मदत सुपूर्द केली.
यावेळी सरपंच श्रीकांत जाधव, शाखाप्रमुख संदीप जाधव, शंकरराव तायडे, ज्ञानेश्वर पवार, माधवराव भुसारी, भागवतराव तायडे, विनोद तायडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जळालेलं पीक परत येणार नाही; पण संकटात कुणीतरी पाठीशी उभं आहे, हा विश्वास लाखमोलाचा असतो! शिवाजीराव तायडे यांच्या कृतीने हाच माणुसकीचा संदेश दिला. कारण दान पैशांचं नसतं, तर संकटात दिलेल्या आधाराचं असतं!






Total Users : 3639152