spot_img
spot_img

BIG IMPACT! गड्या, बातमीत दम असतो… बरं का! ‘हॅलो बुलढाणा’चा दणका, कर्तव्यदक्ष BDO बांगर साहेबांचा तडकाफडकी आदेश अन् ग्रामपंचायतीची थेट स्पॉटवर धडक! काल बातमी, आज कामाला सुरुवात; मलकापूर पांग्र्यात सरपंचांनी दाखवली कामाची धमक!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) बातमी केवळ प्रसिद्ध करण्यासाठी नसते, तर जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी असते! याचाच जबरदस्त प्रत्यय सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे आला आहे. काल १७ ऑक्टोबरला ‘हॅलो बुलढाणा’ने पाण्याच्या नासाडीचा प्रश्न मांडला आणि १८ ऑक्टोबरला प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली! यालाच म्हणतात पत्रकारितेचा प्रभाव आणि प्रशासनाची तत्परता!

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मलकापूर पांग्र्यात लाखमोलाचे पाणी गल्लीबोळांतून नाल्यांमध्ये वाहून जात असल्याचे वास्तव ‘हॅलो बुलढाणा’ने समोर आणले. बातमी पाहताच कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांनी क्षणाचाही विलंब न लावता ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

विशेष म्हणजे बांगर साहेबांचे निर्देश मिळताच ग्रामपंचायत प्रशासनही ॲक्शन मोडवर आले! दुसऱ्याच दिवशी ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे, सरपंच पती यादव आप्पा टाले यांनी मजुरांच्या मदतीने प्रत्यक्ष घटनास्थळी पाणीगळती दुरुस्तीचे काम हाती घेतले. सरपंचांनी विशेष लक्ष घालून कामाला गती दिली, तर ग्रामपंचायतीने कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य दिले! दुरुस्तीचे काम सुरू असून ही तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे.

अधिकारी असावा तर असा!

जनहिताचा प्रश्न समोर येताच संवेदनशीलतेने निर्णय घेणारे BDO अजितकुमार बांगर, आदेशाची तातडीने अंमलबजावणी करणारे ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे आणि कामासाठी पुढाकार घेणारे सरपंच व ग्रामपंचायत प्रशासन यांनी प्रशासकीय कार्यतत्परतेचा आदर्श घालून दिला आहे.
‘हॅलो बुलढाणा’चा आवाज म्हणजे जनतेच्या प्रश्नांचा आवाज! काल बातमी, आज कार्यवाही! आता गावातील उर्वरित पाणीगळतीही कायमस्वरूपी थांबविण्याची अपेक्षा आहे.म्हणूनच गड्या, बातमीत दम लागतो…! ‘हॅलो बुलढाणा’च्या बातमीत दम असतो… बरं का!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!