spot_img
spot_img

निराधार महिलेचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी! – लाखोंचे झाले नुकसान

चिखली (हॅलो बुलढाणा) प्रभाग क्रमांक ५ मधील संत रविदास नगर येथे राहणाऱ्या निराधार महिला म्हाळसाबाई पुंडलिक घाडगे यांच्या घरात काल १७ जुलै रोजी रात्री अचानक आग लागली. आग मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि घरातील सर्व वस्तू व साहित्य जळून खाक झाले असून या आगीत लाखांचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक चेतन घाडगे यांनी पत्रकार छोटू कांबळे यांना त्वरित कळवली. त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला फोन करून अग्निशमन दलाचे तुकडी घटनास्थळी बोलवून घेतली. स्थानिक नागरिक आणि छोटू कांबळे यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आग मोठी असल्यामुळे ती नियंत्रित करणे कठीण झाले. अग्निशमन दलाच्या तुकडीने त्वरित आग विझवून मोठी हानी टाळण्यास यशस्वी झाले. या आगीमध्ये घरातील सर्व भांडीकुंडी, कपडे, धान्य आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. याप्रकरणी छोटू कांबळे यांनी म्हाळसाबाई घाडगे यांना आश्वासन दिले आहे की ते जळून खाक झालेली कागदपत्रे पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. तसेच, तलाठी खेडेकर यांच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे म्हाळसाबाई घाडगे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांना त्वरित मदतीची आवश्यकता आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!