spot_img
spot_img

BIG BREAKING! देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या टाऊन हॉलमध्ये आगीचा भडका! वीजच नाही, तरी दुसऱ्या मजल्यावर आग लागली कशी? हजारो नागरिकांचे जुने दस्तऐवज सुरक्षित की आगीच्या भक्ष्यस्थानी? आगीमागे अपघात की आणखी काही गौडबंगाल?

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) वीजपुरवठ्याची व्यवस्थाच नसताना नगरपरिषदेच्या टाऊन हॉलच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागतेच कशी? या गंभीर सवालाने देऊळगाव राजा शहरात खळबळ उडाली आहे! आज रविवार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास नगरपरिषदेच्या टाऊन हॉलमध्ये आगीचा भडका उडाल्याने प्रशासनाची एकच धावपळ झाली.

आगीची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, या आगीमुळे आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत!

जिथे वीजच नाही, तिथे शॉर्टसर्किटचा प्रश्नच कुठून? मग आग नेमकी लागली कशामुळे? ही दुर्घटना आहे की यामागे आणखी काही कारण दडले आहे, याबाबत शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे नगरपरिषदेत जतन असलेल्या हजारो नागरिकांच्या जुन्या दस्तऐवजांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळाली आहेत का? असल्यास किती? याचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही.आता नगरपरिषद प्रशासनाने आगीचे नेमके कारण शोधून निष्पक्ष चौकशी करावी आणि दस्तऐवजांच्या सुरक्षिततेबाबत स्पष्ट माहिती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!