चिखली (हॅलो बुलढाणा) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिभावंत लेखक होते. वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी त्यांची ख्याती आहे.अशा साहित्यरत्नाला त्यांच्या 55 व्या स्मृतिदिना निमित्त 18 जुलै रोजी अभिवादन करण्यात येऊन महामानव अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
पंचायत समिती जवळील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाज बांधवांकडून सकाळी 10 वाजता हा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थिती जेष्ठ समाजसेवक मोहनदादा खरात, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष भाई छोटू कांबळे व उपस्थित समाज बांधवांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले .
यावेळी गजानन गायकवाड , ज्ञानेश्वर घाडगे,कृष्णा साळवे, गोपाल साबळे, सुभाष साबळे, विजय सिनगारे, किशोर सोनारे, अशोक खरात, अजय वानखेडे, संतोष घाडगे, पंडित कांबळे, सचीन कांबळे, राज नेमाडे, भोला उमक, अनिल तायडे, सागर खरात, राहुल तायडे, अमोल साबळे , मारोती घाडगे, मंगेश घाडगे यासह इतर मान्यवरांनी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या अभिवादन सभेचे आयोजन सकल मातंग समाजाचे सर्वेसर्वा,युवा नेते तथा पत्रकार छोटु कांबळे यांनी केले होते.