बुलढाणा (हॅलो बुलढाणा न्यूज नेटवर्क) दिवाळी म्हटली की फराळाचा सुगंध, नात्यांचा गोडवा अन् आपुलकीची आठवण! पण नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त घरापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या माणसांना यंदा घरच्या फराळाची चव चाखता येणार आहे. कारण भारतीय डाक विभागाने दिवाळीनिमित्त खास पुढाकार घेतला असून, बुलढाणा विभागातील तब्बल ३६८ पोस्ट ऑफिस फराळ पार्सल बुकिंगसाठी सज्ज झाले आहेत!
आईच्या हातचे लाडू, आजीची चकली, घरचा चिवडा, करंजी आणि खमंग शंकरपाळे आता थेट देश-विदेशातील नातेवाईकांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये माफक दरात पार्सल बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
घरापासून दूर असलात तरी दिवाळीच्या फराळापासून दूर राहण्याची गरज नाही! हाच संदेश देत डाक विभागाने नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
बुलढाणा विभागाचे डाकघर अधीक्षक गजेंद्र जाधव यांनी नागरिकांना ‘घरचा फराळ, आप्तेष्टांपर्यंत’ ही संकल्पना साकारण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : महेश चव्हंड- ८६०५१९४६४०, शेख शब्बीर शेख बुडण – ९७६७२१७८७९, राजू पोफळे – ९४२१६६१६८२






Total Users : 3611313