spot_img
spot_img

परिस्थितीने खचली..! शेतकऱ्याच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या! बिरसिंगपूर येथील घटना… 

बुलडाणा (हॅलो बुलढाणा) बिरसिंगपूर येथील अल्पभूधारक शेतकरी शेतमजुराच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज,१५ ऑक्टोबरच्या दुपारी १२ वाजेच्या ही घटना उघडकीस आली. प्रतिभा प्रकाश मुळे(२२) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी विष्णू भिवसन मुळे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मुलीचे वडील प्रकाश मुळे अल्पभूधारक शेतकरी आहेत. सातत्याने येणारी नापिकी, घरातील हलाकीची परिस्थिती आणि खाजगी कर्जामुळे ते चिंतेत होते. वडिलांच्या परिस्थितीमुळे मुलगी प्रतिभा देखील निराश, हताश झाली होती. अभ्यासात हुशार असूनही परिस्थितीमुळे ती उच्च शिक्षण घेऊ शकली नव्हती.आज सकाळी तिचे वडील आणि लहान भाऊ बुलढाण्यात आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तर आई सोयाबीन सोंगण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात गेली होती. साडेअकराच्या सुमारास प्रतिभाची चुलत बहीण संध्या शेतातून घरी आली, त्यावेळी तिला शेजारचे काकाचे घर बंद दिसले, तिने घर वाजवले मात्र आतून दरवाजा उघडला नाही,त्यामुळे खिडकीतून पाहिले असता तिला चुलत बहीण प्रतिभाने घरात गळफास घेतल्याचे दिसले. तिने कुटुंबीयांना फोन करून याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!