बुलढाणा (हॅलो बुलढाणा) धामणगांव बढे येथे शेतात मका या पिकावर औषध फवारणी विषबाधा होऊन एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 2 महिला व एक युवक गंभीर असल्याचीही दुर्दैवी बाब समोर येत आहे. दामोदर जाधव वय 70 असे मृतकाचे नाव आहे. गंभीर झालेल्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गंभीर झालेल्यांची नावे देखील हॅलो बुलढाणा च्या हाती लागली आहे. मोहन देवानंद जाधव वय 12, बेबीबाई शिवाजी जाधव वय 57, सुभद्राबाई लक्ष्मण जाधव वय 60 अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व धामणगाव बढे येथील राहणारे आहेत. तत्पूर्वीच हॅलो बुलढाणा ने फवारणी संदर्भात शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले होते हे विशेष.