spot_img
spot_img

हरविलेल्या मोबाईलची घंटा पुन्हा खणखणली! -चिखली पोलिसांचा मोबाईल शोध! – २ लाखांचे गहाळ मोबाइल शोधून मूळ मालकांना परत!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात चिखली पोलिसांनी हरविलेले २ लाख रुपये किंमतीचे मोबाईल शोधून काढत मूळ मालकांच्या स्वाधीन केलेत. त्यामुळे मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तरळतांना दिसून आला.

गत काही महिन्यांत चिखली पोलीस स्टेशन हद्दितून मोठ्या प्रमाणात मोबाइल गहाळ झाले होते. या बाबत चिखली पोलिसांत तक्रारीही नोंदविण्यात आल्या होत्या. गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध घेऊन मुळ मालकांना परत करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी दिले होते. पोलीस अधीक्षक कडासने यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनात ठाणेदार संग्राम पाटील, पोलीस अंमलदार विजय किटे, सुनील राजपूत, चंद्रशेखर मुरडकर, महिला पोलीस अंमलदार रुपाली उगले यांनी यांनी मोबाइलची शोध मोहिम राबवून रिअल मी, ओपो, वीवो, इनफिनिक्स, रेड मी, वन प्लस, पोको, नॅजरोसह विविध कंपनीचे १८ मोबाइल (किंमत २ लाख रुपये) शोधून काढून काढून मुळ मालकांना परत केले. याकामी चिखली पोलिसांना बुलढाणा येथील तांत्रिक विश्लेषण शाखेचे मोलाचे सहकार्य मिळाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!